
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज भारतीय किसान संघ राळेगाव व डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकरी संघ राळेगाव चे संयुक्त विद्यमाने अतिवृष्टी मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी पिकांची नुकसान भरपाई व सरसकट पिक विमा शासनाने तातडीने द्यावा करीता तहसीलदार साहेब श्री रवींद्र कुमार कानडजे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी दीलीपभाऊ भुडे, दिलीप भाऊ हिवरकर, विनोदभाऊ निखडे, अविनाशभाऊ मासुरकर, शंकरभाऊ सातपुते, अंबादासजी झुंझुरकर श्रीकृष्णजी पाल, नामदेवजी झोटींग, रमेशजी सोनेकर, सुधीर भाऊ जवादे युसुफ अली सैयद सह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
