वडकी वरून भरधाव वेगात इंडिका विस्टा ही सावंगी टर्निंग जवळ नालीत कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वडकी वरून असताना यवतमाळला भरधाव वेगात जात आलेली इंडिका विष्टा गाडी येवती फाट्याजवळ सावंगी गावाजवळ रोडच्या कडेला नालीत घुसल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला हि घटना २१ डिसेंबर मंगळवारी रात्री १०:०० वाजताच्या दरम्यान घडली सुरभीनगर यवतमाळ येथील जगदीश शांताराम नारनवरे ५० वर्ष हा एका कंपनीचे दिष्टयुबुटर चे काम करतो कंपनीचे काम आटोपून रात्री १० वाजताच्या दरम्यान वडकी वरून यवतमाळ ला एम एच २९ ए आर ०८५३ इंडिका विष्टा गाडीने जात असताना गाडी कंट्रोल न झाल्याने नालीमध्ये गेल्याने वाहन चालक हे जागीच मृत्यूमुखी झाल्याचे समजते. व तसेच या टर्निंग वर अनेकदा अपघात झाल्याचे सांगितले जात असते कारण येवती,धानोरा टर्निंग व वाढोणा,वडकी टर्निंग हे एकाच जागी असल्याने वाहन चालकांना टर्निंग समजण्यास अर्थळा येत असते त्यामुळे वाहन कंट्रोल न झाल्याने अपघात होत असतात. व या टर्निंग वर अपघाताची मालिका सुरू आहे. तरी प्रशासनाने विशेष लक्ष देऊन टर्निंग चा बंदोबस्त करावा अशी मागणी जनता करीत आहे.