पत्रकारांना धमकी देणाऱ्या नायब तहसिलदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी:राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

    

लोकशाही च्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा अनेक घटना पुढे येत आहे अशीच एक घटना यवतमाळ येथील तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसिलदार अजय गौरकार यांनी भ्रमणध्वनी वरून जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ओंकार चेके यांना धमकी दिली. हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी असून अश्या प्रवृत्ती चा निषेध व या धमकी देणाऱ्या नायब तहसिलदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना दिलेल्या निवेदनातून राळेगाव तालुका पत्रकार संघटनेने केली आहे.
ओंकार चेके यांनी शालेय विध्यार्यांना वेळेवर लागणारे शालेय दाखले जे महसूल विभागातील तहसिल कार्यालयातून मिळत असतात आणि हे दाखले मिळण्यास विलंब झाल्यास विध्यार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून ते लवकर मिळावे या उद्देशाने वृत्त प्रकाशित केले, यावरून नायब तहसिलदार यांनी हे वृत्त का ? प्रकाशित केले असा सवाल करून असभ्य भाषेचा वापर करून धमकी दिली. यावरून पत्रकारांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या चुकीच्या धोरणाविरोधात वृत्त प्रकाशित करू नये का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून संबंधित नायब तहसिलदारा विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन सादर करताना राळेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश काळे, उपाध्यक्ष विशाल मासुरकर, दीपक पवार, सचिव फिरोज लाखाणी, महेश शेंडे, राष्ट्रपाल भोंगाडे, सचिन राडे, धिरज खेडेकर, रामू भोयर, राजू काळे, प्रविण गायकवाड, रणजीत परचाके, शालीक पाल, विनोद माहुरे, मनोहर बोभाटे सह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.