

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर,राळेगाव
तालुका प्रतिनिधी राळेगाव:- रामभाऊ भोयर
राज्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे यात राळेगाव नगरपंचायत मात्र राळेगाव तालुका कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरुण मोकळं आणि त्याची टीम राळेगाव येथील महत्वाच्या ठिकाणी कोव्हिड टेस्ट करतांना दिसत आहे. यात राळेगाव तालुका हा कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी नागरपंचायत मुख्याधिकारी अरुण मोकळ व त्यांची टीम मात्र खूप मेहनत घेत असल्याचे दिसते. महत्वाचे म्हणजे एक मे पासून आता परेंत नगरपंचायत कडून 2500 टेस्ट करण्यात आल्या आहे. मुख्याधिकारी अरुण मोकळ स्वतः रस्त्यावर उतरून राळेगाव शहर कोरोना मुक्त रहावे या करीता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे दिसते.
“जनतेला आव्हान करतो की राळेगाव तालुक्यतील लोकांनी
काळजी घेणे महत्वाचे आहे. अचानक ताप आला, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास जाणवला, तर अजिबात वेळ न घालवता टेस्टिंग करावी . तुम्ही अशी लक्षणं जाणवत असतील, तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन मोफत तपासणी करुन घेऊ शकता. साबण आणि पाण्याने हात स्वछ धूत राहावे. सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे.. यामुळे तुमच्या हातावर असलेले विषाणू निष्क्रीय होतात. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे. आपल्याला आपला तालुका व स्वतःला कोरोनापासून दूर ठेवायचे आहे त्या करीता नगरपंचायत उपाययोजने करीता सहकार्य करा.”
