नायलॉन मांजा ठरतोय पक्ष्यांसाठी कर्दनकाळ :-पक्षीमित्र निखील चव्हाण

नायलॉन मांजा पक्ष्यासाठी जीव घेणा ठरत आहे झाडावर पक्ष्यांचा वास असतो व त्याच्या मधुर आवाजामुळे निसर्गरम्य वातावरणात जणु मोहक होऊन जाणे पक्ष्याच्या कीलबिल आज काल फार कमी होत चालला आहे. आजवर मकरसक्रांतीला जास्त प्रमाणात पतंग उडवतात त्यामधे जास्त प्रमाणात नायलॉन मांजा चा वापर केला जातो.त्यामुळे अनेक पक्षी अडकुन मरण पावतात तर काहींना वनविभाग व पक्षी मित्रांना वाचविण्यात यश मिळतो.
शिवाय माणसाला सुद्धा नायलॉन मांजा मुळे प्राण गमवावे लागत आहे. रस्त्यांने मोटार सायकल स्वार जात असतांना मांजा गळ्यात अडकुन अनेक लोक जखमी झाली आहे.तर काहीनी आपला जीव सुद्धा गमावला आहे.

मांजामुळे दुचाकी वाहनावर शहराच्या विविध भागातून जीव मुठीत घेऊन जावा लागत आहे
आपल्या भागातील अनेक पक्ष्याना पक्षीमीत्रानी जिवन दान दिले आहे त्यात चीमणी , कावळा , पोपट , कबुतर मैना भैरी बुलबुल कोयल पारवा इत्यादी आहे रात्री भरारी घेणारे गव्हाणी घुबड मांज्यात अडकुन मरण पावतात.

मंकरसंक्रांतीला ‘तीळगुळ घ्या , गोड-गोड बोला , असे म्हटले जात असले तरीही माणसाच्या विचित्र वागण्यामुळे पक्ष्यांशी असलेला घट्ट स्नेह कमी होत चालला आहे . उत्सवी वातावरणात काचाची धार लावलेल्या मांजामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे . नायलॉन मांजा चा वापरामुळे पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे त्यामुळे पक्षीमीत्र आव्हाण करीत आहे की पतंगोंत्सवाचा आनंद खुल्या मैदानात घ्यावा
पक्षी वाचवा निसर्ग वाचवा विनंती केली जात आहे .

  • निखिल हरीदास चव्हाण ( पक्षीमीत्र)