
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

येवती ता.राळेगाव येथील अतिवृष्टी ने बाधीत झालेल्या शेती जमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गावाजवळील नाल्याचे बांध फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसुन हजारो हेक्टर जमीन खरडल्या गेली.शेतकरी हवालदिल झाला.या शेतीची पाहणी करताना माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके सोबत राजु भाऊ ठाकरे, पंकजजी गावंडे,आशीषजी पारधी,गिरीशभाऊ वैद्य, रामजी कुरटकर, आनंदराव चौधरी, सुधाकरजी वाघ,सागरजी वाघ,किशोरजी राऊत,प्रभाकर जी ठाकरे,मंगेशजी पारधी,रामाजी भोयर , विठ्ठलराव मानकर, रामकृष्ण जी गावंडे,समीरजी पोहदरे,बाळुभाऊ टापरे, वासुदेवराव वानखडे उपस्थित होते.वर्धा नदीच्या काठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असुन शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली तसेच गावाजवळील नाल्याचे सरळीकरण लवकरात लवकर करुन देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.येवती – धानोरा भागातील शेतकरी अतिवृष्टी ने चिंतेत असुन जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र आहे.धानोरा येथील रस्त्यावर असलेली जुमनाके यांची शेती चे झालेले नुकसान अतिवृष्टी चे भयावह चित्र निर्माण करते तसेच येवती येतील श्रावण सेवकार यांचे शेतीचे झालेले नुकसान डोळ्यात अश्रू आणु शकते असे चित्र आहे.
