अत्याचारातील आरोपी कुख्यात गुंड बागाला अटक करुन कठोर शिक्षा करा !

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

शहरातील एका १९ वर्षीय युवतीवर घरात कुणी नसल्याची संधी साधून नराधम बागा उर्फ अक्षय शरद बगमारे (२३) रा.जामनकर नगर याने सतत अत्याचार केला व नंतर त्याने तिला बेशुद्ध करून अनोळखी ठिकाणी नेऊन परत अत्याचार केला नंतर जिवघेणी मारहाण केली व दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पीडितेला एका वाहनाने परिसरात सोडुन दिले.पिडीत मुलीचे वडील रात्रपाळीची ड्युटी करुन घरी परतल्यानंतर हा गंभीर प्रकार मुलीच्या वडीलांना माहित झाला.घटनेनंतर पीडित तरुणीने अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.याप्रकरणी आरोपी बागा उर्फ अक्षय शरद बगमारे याच्यावर ३७६ (२) (एन), ३२३, ५०४, ५०६ व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा करण्यात आला आहे.
मात्र सहा दिवस उलटून आरोपी अद्यापही फरार असल्याने पिडीत कुटुंब दहशतीत आहे. आरोपीला त्वरित अटक करुन कठोर शिक्षा करावी अशी मागणी भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतिने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांचे मार्फत राष्ट्रपती यांना पाठवलेल्या निवेदनातुन केली आहे.
यापूर्वी ही या गुंड प्रवृतीच्या नराधम बागा उर्फ अक्षय शरद बगमारे याने यापुर्वी ही अशाच प्रकारे अनेक मुलींवर तसेच विशेषतः अनुसूचित जातीच्या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना केल्याचे परिसरात बोलल्या जात असुन कुख्यात गुंड असल्यामुळे कुणीही तक्रार करण्याची हिम्मत करत नाही.यामुळे अशा नराधमांची हिम्मत वाढलेली आहे.करिता अशा आरोपीला मोकाट सोडणे समाजाला घातक ठरू शकते अशा या आरोपीला त्वरित अटक करुन कठोरात कठोर शिक्षा करावी व या पुर्वी केलेल्या अत्याचाराची चौकशी सी.आय.डी मार्फत करावी तसेच भविष्यात होणारे अनर्थ टाळावे अशी भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतिने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांचे मार्फत राष्ट्रपती यांना पाठवलेल्या निवेदनातुन केली आहे.यावेळी निवेदन देताना मीरा फडणीस,मनीषा तिरणकर,संतोषी वर्मा,मकसूद अली,राज वर्मा,सुकांत वंजारी,शर्वरी फडणीस,पीडित मुलीचे वडील आदी उपस्थित होते.