
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार राजू शेषराव काळे यांना शांताई कला व विज्ञान जुनिअर कॉलेज येरद जिल्हा यवतमाळ चे संस्थाचालक महेश राठोड यांनी पत्रके का वाटली नाही या कारणावरून दूरध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी आज सकाळी साडेसहा वाजता दिली या घटनेचा राजू काळे यांना मानसिक त्रास असून त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली आहे राळेगाव तालुका पत्रकार संघटनेकडून या घटनेचा तीव्र निषेध केला असून माथेफिरू संस्थाचालकांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी करण्याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय चौबे यांना दिले आहे पीडित वृत्तपत्र विक्रेते राजू काळे यांच्या तक्रारीवरून संस्थाचालक महेश राठोड यांचेवर गुन्हा दाखल केला आहे यावेळी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष विशाल मासुळकर सचिव फिरोज लाखानी प्रकाश मेहता डॉ कैलास वर्मा महेश शेंडे अशोक पिंपरे मंगेश राऊत महेश भोयर गजानन तुमराम संजय दू र बुडे मनोहर बोभाटे अरविंद तेलंगे गजेंद्र ठूणे धीरज खेडेकर यांची उपस्थिती होती.
