
बेंबळा प्रकल्पाचे मुख्य कालव्यातून निघणार्या उपमुख्य कालवा कीन्ही जवादे ते बोरी ईचोड या कालव्याचे काम पुन्हा एकदा होत असुन, यांमध्ये मोठ्या पाईप द्वारे शेतीला पाणी पुरवठा होत आहे.यापुर्वी खोदलेल्या कालव्यातुन शेतकऱ्यांना योग्य प्रकारे पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची होती, याबाबत माहिती देऊन संबंधित यंत्रणेकडून काम मंजूर करून घेतले.या कामाची पाहणी करण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख पाणी वापर संस्था चे संचालक हजर होते.काम सुरू असताना कामांवर लक्ष द्यावे, नंतर तक्रार करून उपयोग नाही अशी भूमिका संस्थेचे अध्यक्ष सुधीर जवादे यांनी विषद केली.यावेळी संचालक वर्षाताई मोघे प्रविण गोटेफोडे वैजयंतीताई चवरडोल विलासराव क्षीरसागर वैभव चवरडोल,विरुभाउ मोघे, दशरथ भाऊ गोटेफोडै उपस्थित होते.
