राळेगाव तालुक्याला झालं तरी काय ?थांबता थांबेना अपघातांची शृखंला आणि चोरीच्या घटना?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

गेल्या तीन ते चार महिन्या पासून राळेगांव शहरात व तालुक्यात थांबता थांबेना अपघातांची शृखंला आणि चोरीच्या घटना असच म्हणायला हरकत नाही.
दररोज छोटेमोठे अपघात होत आहे.यामध्ये या वर्षी आता पर्यंत पंचवीस च्या वर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे.
या साठी मुख्यत्वे जवाबदार अती वेगाने वाहन चालविणे, अती मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालविणे,यांचेवर कोणाचाच अंकुश नाही,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्ट बी हा सिमेंट रोड तयार करतांना नजरेआड केलेल्या चुकांची फळ निरपराध लोकांना मिळत आहे. टीन एजर्स चॅम्पियन्स बाईक स्वारांचा दिवसेंदिवस हैदोस मोठ्या प्रमाणावर वाढला असून पोलिस स्टेशन राळेगांव व वडकी यांचे दुर्लक्ष हे देखील महत्वाचं कारण आहेच.
चोरीचे प्रमाण तर वाढतचं आहे,होंडा चे शोरुम फोडून नवी कोरी बाईक व सर्व किल्ल्यांचा जुडगा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.या सह त्याच दिवशी सात व्यापारी प्रतिष्ठानांचे कुलूप तोडण्यात आले आहे.
मोटरसायकल चोरी तर दर दोन दिवस आड संपूर्ण तालुक्यात ठरलेलीच आहे. या सह शेतकऱ्यांच्या विद्यूत मोटारी व डिझेल इंजिन चोरी जाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेष म्हणजे काही मोजके अपवाद वगळता बहुतांश चोरीचा तपासाचं काय? हा प्रश्न देखील जैसै थेच.
हवा तेवढा पोलिस ताफा नाही ,कर्मचाऱ्यांचा अनुशेष दोन्ही पोलिस स्टेशन मोठ्या प्रमाणावर आहे..
हे जरी खरे असले तरी आहे त्या परिस्थितीत नागरिकांच्या जिवित्वाची,मालमत्तेचे संरक्षण करण्याची सरतेशेवटी मुख्य जवाबदारी पोलिस प्रशासनाचीच आहे , कारण अवैध व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर सुरु चं असून हे भरभक्कम आर्थिक पाठबळ असल्याने च बिनधास्त पणे सुरु चं आहे.