
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आदिवासी समाजातील महीलांच्या समस्या, त्यांचे प्रश्न तसेच महीला स्वावलंबन व सक्षमीकरण यासाठी काम करीत असलेल्या ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य उपाध्यक्ष पदी रचना मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोदभाऊ घोडाम यांनी केली आहे. रचनाताई मेश्राम ह्या एम.बी.ए.झालेल्या असून मार्केटिंग मँनेजमेंट क्षेत्रात अनुभवी आहे..
महीलांचे स्वावलंबन व सशक्तीकरणासाठी सतत प्रयत्नशील राहून त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात बचत गटामार्फत वनधन केंद्राची निर्मिती करुन महीलांना आर्थिक द्रुष्ट्या सक्षम करण्यासाठी रोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिले.या वनधन विकास केंद्रामधून तयार होणाऱ्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता वस्तुंचे विक्री व प्रदर्शनी मेळाव्याचे आयोजन करुन वस्तुंची विक्री करण्याचे माध्यम उपलब्ध करुन दिले.त्या महीला स्वावलंबन व सशक्तीकरणासाठी सतत प्रयत्नशील आहे आदिवासी समुहाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी शासनाच्या विविध योजना दुर्गम भागात राहणा-या समाजबांधवां पर्यंत पोहोचविल्या आहे. त्यांच्या निवडीचे श्रेय त्या ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्याध्यक्ष मिनाक्षीताई वट्टी, महासचिव प्रा.जयश्रीताई साळुंके, यवतमाळ जिल्हाध्यक्षा सिमाताई मंगाम यांना देतात.
