
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
घाटंजी तालुक्यातील पगडी येथील रहिवासी संतोष ठाकरे , दिशा या पती पत्नी मध्ये नेहमीच शारीरिक सुखाच्या कारणावरून वाद व्हायचे पत्नी ने शरीर सुखाला नकार दिल्यानं पत्नीचा खून केला असल्याची धक्कादायक घटना घाटजी तालुक्यातील पगडी येथे घडली असुन संतोष यांनी पत्नीच्या मानेवर व डोक्यावर कुर्हाडीने सपासप वार करून पत्नीची हत्या केली आहे,दिशा संतोष ठाकरे असं मृतक महिलेचं नाव आहे,
पती संतोष ठाकरे हा नेहमीच पत्नी दिशाला शरीरसुखाच्या मागणीवरून वाद घालायचा, याच कारणावरून पती पत्नी मध्ये वाद व्हायचे पतीने अनेक दिवसापासून राग मनातधरून ठेवला होता.अशातच आज दि.१० ऑक्टोंबर सकाळी अंदाजे ६ वाजता च्या दरम्यान पती संतोषने पुन्हा पत्नी दिशाला शरीर सुखाची मागणी करत वाद घातला, या वादात पती संतोष चा राग अनावर झाल्याने त्याने कुर्हाडीने दिशाच्या डोक्यात व मानेवर सपासप वार करुन पत्नीला जागीच ठार केले,याघटनेची घाटजी पोलिसांना माहिती मिळताच घटना घटनास्थळी आरोपी संतोष गुरूदेव ठाकरे याला अटक करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालय पाठवण्यात आला आहे.असुन याघटनेचा पोलीसांनी
पंचनामा केला असुन याघटनेचा पुढील तपास घाटंजी पोलिस करीत आहे.
