
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या येवती येथे
१६ जानेवारी २०२२ रोजी बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अरविंद कुळमेथे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत जिल्हा संपर्कप्रमुख जगदीश मडावी,राळेगाव उपविभाग संपर्कप्रमुख सुरज मरस्कोल्हे, राळेगाव तालुका अध्यक्ष दिनेश करपते,सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदन कन्नाके, विद्यार्थी बीरसा ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष विकास उईके,संघटक गणेश शिंदे,प्रमोद ईरपाते, महादेव मेश्राम, गजानन वरखडे, यांनी बीरसा ब्रिगेड शाखा येवती, तालुका राळेगाव कार्यकारिणी गठित केली.
यावेळी शाखा अध्यक्ष अनिल सोयाम ,उपाध्यक्ष हरिकेश कोरांगे, सचिव रोशन ऊईके, संपर्क प्रमुख सुरज जुमनाके, कोषाध्यक्ष गोपाल मडावी, संघटक अमोल टेकाम, सहसचिव प्रल्हाद कोरांगे,सह संघटक रामू नेहारे,
महिला बीरसा ब्रिगेड शाखाध्यक्ष अनिताताई कुडमेथे, उपाध्यक्ष चंदाताई उईके, जोशना सोयाम , संघटक करिष्मा कन्नाके, संपर्क प्रमुख मंगलाताई मेश्राम, यांची नियुक्ती नियुक्तीपत्र देऊन व सभा घेऊन फलक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मालाताई कनाके, मनीषा उईके , विशाखा जुमनाके, गिरजा जुमनाके, कविता कोरांगे, गुंफा कोरांगे , जगन कुडमेथे ,कवडू कन्नाके ,माणिक जुमनाके, रवींद्र पंधरे, भारत कुडमेथे आदी तालुका राळेगाव येथील येवती शाखेचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.
