
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सद्यस्थितीत जिल्ह्यासह राळेगाव शहरांमध्ये सुद्धा उन्हाची भीषण तीव्रता आहेत उन्हाच्या तीव्रतेचा प्रत्येक गोष्टीवरती जसा परिणाम होतो तसाच तो कापूस खरेदी वरती सुद्धा झाला आहे जिल्ह्यामध्ये राळेगाव ही कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते दरवर्षी जवळपास दहा लाख क्विंटलच्या जवळपास कापूस खरेदी राळेगाव मध्ये केल्या जाते यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी राळेगाव मध्ये केल्या गेली सद्यस्थितीचा विचार केला तर कापसाचा हंगामा हा शेवटच्या टप्प्यात आला आहेत आणि विशेष म्हणजे राळेगावचे तापमान हे 44° च्या वरती गेले आहेत इतक्या तापमानामध्ये कापसाची खरेदी करणे जिनिंग मालकांना जिकरीचे वाटत आहेत इतक्या तापमानात कापसाचे जिनिंग प्रेसिंग करणे ही तारेवरची कसरत आहेत जिनिंग फॅक्टरी चा विचार केल्यास फॅक्टरीमध्ये करोडो रुपयांचा कापूस असतो सोबतच मशनरी व इतर साहित्य सुद्धा असतात इतक्या तापमानामध्ये फॅक्टरीमध्ये फायर व्हायला वेळ लागत नाही कारण कापूस ही आगीच्या दृष्टीने अतिशय नाजूक वस्तू आहेत या आधी राळेगाव मध्ये काही जिनिंग मध्ये फायर झालेला आहे उन्हामध्ये जिनिंग मध्ये काम करणाऱ्या मजुरांची लाहीलाही होते तसेच शेवटचा कापूस खाली करताना मजुरांना खाजेसारख्या आजाराला सामोरे जावे लागू शकते अनेक जिनिंग मालक हे दुपारच्या वेळेस आपल्या फॅक्टरी बंद ठेवतात रात्रीमध्ये आपल्या फॅक्टरी चालू ठेवतात शिवाय संपूर्ण हंगाम व्यवस्थित गेला व शेवटच्या टप्प्यात काही अनुचित घटना झाली तर त्याचा फटका जिनिंग मालकाला मोठ्या प्रमाणात बसतो याचाही विचार करून जिनिंग मालक शेवटच्या टप्प्यात कापसाची खरेदी करतात सद्यस्थितीत राळेगाव येथे चांगल्या प्रतीच्या कापसाला 8500 रुपयापासून दर मिळत आहेत सी सी आय ने मागच्या महिन्यांमध्येच आपली खरेदी बंद केली आहेत सद्यस्थितीत खुल्या बाजारामध्ये कापूस विकल्या जात आहेत राळेगाव बाजार समितीमध्ये आजतागायत नऊ लाख 68 हजार क्विंटल कापसाची खरेदी बाजार समिती मार्फत झाली त्यामध्ये तीन लाख 12 हजार क्विंटल सीसीआयने खरेदी केला तर सहा लाख 56 हजार क्विंटल कापूस खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला म्हणजेच खरेदीमध्ये खाजगी व्यापाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहेत प्रतिक्रिया संजय घिया संचालक तुलशी इंडस्ट्रीज राळेगाव। उन्हाच्या तीव्रतेचा निश्चितच कापसाच्या खरेदी वरती परिणाम होतो उन्हामुळे मजुरांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होतो शेवटी मजुरांच्या भरोशावरतीच आमची फॅक्टरी सुरू असते संपूर्ण हंगाम चांगला गेला असताना हंगामाच्या शेवटी काही अनुचित घटना घडू नये याचा विचार करून जिनिंग मालक शेवटच्या टप्प्यात कापसाची खरेदी करतात
