
प्रमोद जुमडे, हिंगणघाट
#
ग्लोरी क्वीन इंटरनॅशनल २०२४ व डाजलिंग डीवा इंटरनॅशनल सेकंड रनर अप पुरस्कार पटकाविले. # हिंगणघाट चे शिरोपेचात रोवला मानाचा तुरा हिंगणघाट( शहर प्रतीनिधी) श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील बिशप कॉलेज ऑडिटोरियम मध्ये आयोजित मिस अँड मिसेस डाजलिंग दिवा इंटरनॅशनल स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सदर स्पर्धेत हिंगणघाट येथील रागिणी मून यांनी तब्बल दोन पुरस्कार प्राप्त करून ही स्पर्धा गाजविली. सदर स्पर्धेत त्यांनी ग्लोरी क्वीन् इंटरनॅशनल २०२४ हा विशेष पुरस्कार प्राप्त करून डाजलिंग डीवा इंटरनॅशनल सेकंड रनर अप हा अवॉर्ड सुद्धा प्राप्त केला. सदर स्पर्धेत विविध देशातील महिला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. श्रीलंकेतील क्राऊन होल्डर यांचे सहित विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर स्पर्धेत मून यांनी कॅट वॉक करून मोस्ट अट्रॅक्टटिव इंडिया हा टायटल किताब सुद्धा प्राप्त केला. हिंगणघाट सारख्या लहान शहरातील रहिवाशी असलेल्या मून यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजऊन हिंगणघाटच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यापूर्वी त्यांनी मिसेस महाराष्ट्र व मिसेस विदर्भ अवॉर्ड सुद्धा प्राप्त केले आहे. मून यांनी आपल्या यशाचे श्रेय वेरोनीका मायकेल ,जयश्री नायक, शुभांगी झाडे , पती व मुलाला दिले आहे. रागिणी मून यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
