
ढाणकी,प्रतिनिधी प्रवीण जोशी
समाजात जातीय वाद निर्माण होईल अशा दोन घटना एकाच रात्री ढाणकी व गांजेगाव येथे दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्री उघडकीस आल्या . गांजेगाव येथील प्रकरणात पंजाब पिंपरखेडे याने पोलीस चौकीत स्वतः येऊन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या वर भांदवी 295, 298, 379 कलम नुसार गुन्हा नोंद झाला तर ढाणकीत घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात इसमा विरूध्द भांदवी 295 नुसार गुन्हा दाखल करून चौकशी सुरु आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार शहरातील प्रभाग क्र. ३ मध्ये मागील दोन वर्षापूर्वी उभारलेल्या संजय ज्ञानबा परतुडे यांच्या घरासमोरील चौकाला गुरू रविदास चौक असे नाव देऊन फलक उभारण्यात
आले. दिनांक १५ च्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात इसमाने फलकाची विटंबना केल्याची खबर परिसरात वाऱ्यासारखी पसरली.फलकाच्या परीसरात समाज बांधवाची मोठी गर्दी जमली. चर्मकार समाज बांधवांनी, महिला व अबाल वृध्दासह पोलीस चौकी गाठुन चर्मकार समाजाच्या धार्मीक भावना दुखावणाऱ्या समाज कंटकाविरूध्द गुन्हे दाखल करून, त्यांस तात्काळ अटक करा अशी मागणी निवेदणाव्दारे लावून
घरली. त्यावरून पोलीसांनी भारतीय दंड संहिता १८६० अन्वये २९५, कलम अंतर्गत अज्ञात इसमाविरोधात, सोमवार दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता गुन्हा नोंद केला. पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
