
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
मान्सून येईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशीची धूळपेरणी केली पण मान्सून आलाच नाही व अवकाळी पाऊस आला अवकाळी पावसाने धुळपेरणी धोक्यात आली असून ज्या शेतकऱ्याजवळ पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी शेतातील पीक वाचवण्याची धडपड सुरू केली आहे ।।।। तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहेत काही गावात तर 70 टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची धूळपेरणी केली धूळपेरणी करून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या व शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहू लागला मध्यंतरी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले मान्सून कोकणात पोहोचला व काही दिवसातच विदर्भात येईल अशा बातम्या येऊ लागल्या त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धुळपेरणी सुरू केली पण बातम्यांचे तसेच हवामान तज्ञांचे सगळ्यांचे अंदाज फोल ठरले व पाऊस आलाच नाही मध्यंतरी तालुक्यातील काही भागात मंगळवारी व बुधवारी अवकाळी पाऊस झाला या पावसाने शेतात असलेले बियाणे ओली लागले दोन-तीन दिवस जर त्यावरती पाणी आला नाही तर संपूर्ण धूळपेरणीच वाया जाण्याचा धोका आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्याकडे ओलिताची सोय आहे असे शेतकरी आपल्या शेतातील पीक वाचवण्याची धडपड करत आहे त्यांनी स्प्रिंकलर चालू करून पीक वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत मुळातच ओलिताची सोय खूप कमी शेतकऱ्याकडे आहेत शिवाय ज्या शेतकऱ्याकडे ओलिताची सोय असेल तो शेतकरी सुद्धा फार क्षेत्र ओलित करू शकत नाही लाईन तसेच पाण्याच्या अडचणीचा सामना त्यांना करावा लागतो अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सर्व शेताची धूळपेरणी केली आहे अशा परिस्थितीमध्ये तो शेतकरी दोन ,चार ,पाच एकर ओलिताच्या भरोशावर पीक वरती काढू शकतो मोठ्या प्रमाणात पीक वरती काढायचं असेल तर पावसाची गरज आहे सद्यस्थितीत पावसाचे कुठलेच चिन्ह नसून उन्हाने कळस घातला आहे एक दोन दिवसात पाऊस न आल्यास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागेल एवढे निश्चित
