[चोरटे सैराट ] 🥸 एकाच रात्री चार घर फोडली; राळेगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यात अंतर्गत येत असलेल्या चिकना गावात पहाटे दोन ते चार या कालावधीत चार ठिकाणी घरफोडी करून लाखोंचा चोरी करण्यात चोरट्यांना यश आले आहे. राळेगाव पोलीस स्टेशनं अंतर्गत येणाऱ्या चिकना या छोट्याश्या गावात चोरटयांनी चार घरे फोडून हात साफ केले.

एकच गावात एकच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी चोरांनी हाथ साफ केल्यामुळे राळेगाव शहरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने, महागडे कपडे, साड्या, रोकड असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला असल्याची माहिती आहे.बबनराव देशमुख विनोद डहाके विमलबाई गजबे प्रवीण खैरे या सात जणांची घरे चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी चार घरावर हात साफ केला आहे. विशेष म्हणजे ही सगळी घरे चोरट्यांनी एकाच रात्री फोडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.