


प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्य केंद्र घाणीच्या विळख्यात आले आहे.
आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारा जवळच हॉटेल मध्ये उरलेले शिळे अन्न,सडलेला भाजी पाला, फळ, केर कचरा तसेच इतर खराब झालेले साहित्य मोठ्या प्रमाणात हे व्यवसायीक टाकत असल्याने आरोग्य केंद्राचा परिसर घाणीच्या विळख्यात सापडुन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात मोठ मोठाले कचऱ्याचे ढिग साचले आहेत. याच ठिकाणाहून शालेय विद्यार्थ्यांना, नागरिक व रूग्णांना ये-जा करावी लागते.त्यामुळे या दुर्गंधी चा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच आरोग्य केंद्राच्या परिसरात मोकाट जनावरांचा देखील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असते. आरोग्य विभागा मार्फत तसं वेळोवेळी सुचना देऊन नागरिकांना आवगत केल्या जाते की, स्वच्छता ठेवा,आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवा,परंतु सध्या फुलसावंगी आरोग्य केंद्राला व ग्राम पंचायत ला या सर्वांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग तर आजारी पडला नाही ना असा प्रश्न सर्वसामान्याना पडलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे,गवत वाढलेले आहे.आरोग्य केंद्राला लागुनच जि.प.प्राथमिक शाळा आहे.या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.आरोग्य केंद्राच्या परिसरात वाढलेल्या झाडा झुडपांमुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आरोग्य केंद्राच्या परिसरात होणारी घाण कायम स्वरुपी थांबवावी व परिसर स्वच्छ व्हावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
गावातील मोकाट श्वानाचा बंदोबस्त करा
गावात काही ठिकाणी घाण कचरा,प्राण्याचे मास,सडलेले खाद्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर टाकले जात आहेत.ते खाण्यासाठी भटके श्वान तेथे येत आहेत.भटक्या श्वानांची संख्या गावात कमालीची वाढलेली आहे. हे श्वांन हिंस्र होत आहेत व लहान मुलांसह मुक्या जनावरांना लक्ष करत आहेत. त्यांचा त्रास हा शालेय विद्यार्थ्यांसह मोठ्या माणसांना होत आहे.त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायत ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
