ग्राम पंचायत चिखली (व) येथे आमदार मा.श्री.प्रा.डॉ.अशोकराव उईके यांच्या हस्ते व्यायामशाळा लोकार्पण सोहळा संपन्न

1


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


दिनांक:-३०/०७/२०२१ रोजी स्थानिक विकास आमदार निधीतून ग्राम पंचायत चिखली(वनोजा) ला व्यायामशाळा साहित्य देण्यात आले असून आमदार मा.श्री.डॉ.अशोकराव उईके साहेब यांच्या हस्ते व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी आमदार साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केले व चिखली गावासाठी भव्य समाजमंदीर देतो असे ठोस आश्वासन दिले. तसेच पंचायत समिती सभापती माननीय श्री. प्रशांतभाऊ भाऊ तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व्यायाम आणि व्यायामशाळेचे महत्त्व उपस्थित ग्रामस्थांना पटवून दिले ,कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राळेगाव पंचायत समिती सभापती मा.श्री.प्रशांतभाऊ तायडे,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.चित्तरंजनदादा कोल्हे,भाजपा राळेगाव शहर अध्यक्ष मा.श्री.डॉ.कुणालभाऊ भोयर,बाळासाहेब दिघडे,उपसरपंच धानोरा श्री.विशालभाऊ येनोरकर, वालधुर-इंझापुर-कोपरी सरपंच श्री.मोहनभाऊ नरडवार,अंतरगाव सरपंच श्री.प्रविणभाऊ एंबडवार,श्री.हर्षल घोडे ग्राम पंचायत चिखली सरपंच सौ.नलुताई वैरागडे, उपसरपंच श्री.दिपकभाऊ कुमरे,सदस्य-श्री.लोकेशभाऊ दिवे,श्री.सुरेंद्रभाऊ भटकर,सौ.सारिकाताई ठाकरे,सौ.रंजनाताई ठाकरे,सौ.ज्योतीताई पाटील,पोलीस पाटील सौ.कांचनताई घायवटे,ग्रामसेवक-मुन मॅडम,तलाठी-सौ.भोयर मॅडम,ग्राम पंचायत कर्मचारी श्री.कवडुभाऊ पतींग,संगणक परिचालक रितेशजी वनकर,रोजगार सेवक मयुरभाऊ जुमळे,श्री.दुर्वेश उमाटे,श्री.धीरजजी उमाटे,श्री.बाळूभाऊ मुजबैले,श्री. विठ्ठलराव लोखंडे व सर्व गावातील युवा कमिटीचे उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गावकरी नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन चिखली च्या ग्राम सेविका मून मॅडम, प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य श्री. सुरेंद्र भाऊ भटकर, आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य लोकेश दिवे यांनी केले. सादर व्यायामशाळेचा उपयोग सर्व ग्रामस्थांनी योग्य पद्धतीने घेऊन आपले आरोग्य सुदृढ आणि निरोगी बनवावे तसेच तरुण तरुणी यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शारीरिक पात्रतेसाठी सादर युवा सामर्थ्य व्यायामशाळे चा उपयोग घ्यावा असे आवाहन या वेळी बोलताना मा. आमदार साहेबानी उपस्थित ग्रामस्थांना केले.