रिधोरा येथे काकडा आरती दिंडीची सांगता

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे काकडा आरती व संगीतमय भागवत सप्ताह ची सांगता सविस्तर वृत्त असे रिधोरा येथील फुटका मारुती व विठ्ठल रुक्माई देवस्थानच्या वतीने दरवर्षी काकडा आरती करण्यात येते सदर कडाक्याच्या थंडीलाही न जुमानता दररोज सकाळी पहाटे गावातील पुरुष व बालगोपाल हे काकडा आरतीत सहभागी होऊन गावातील प्रमुख मार्गाने फेरी मारून फुटका मारुती व विठ्ठल रुक्माई देवस्थानात येवून काकडा आरतीची समाप्ती करत असतात या एक ते सव्वा महिन्याच्या काकडा आरती समाप्ती निमित्ताने सात दिवसांच्या संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन केल्या जाते व काकडा आरती व सात दिवसाच्या संगीतमय भागवत सप्ताह निमित्य गावामध्ये प्रमुख मार्गाने भजन दिंडीच्या भक्तिमय वातावरणात गावातील महिला भजन मंडळ व पुरुष भजन मंडळ बाल गोपाल हे या दिंडीत सहभागी होऊन काकडा आरती व संगीतमय भागवत सप्ताह समाप्ती उत्सव साजरा करत असतात सदर या सात दिवसाच्या संगीतमय भागवत सप्ताहाचे वाचन इरदंडे महाराज पिंपरी तालुका घाटंजी यांनी केले. तर या संगीतामध्ये सात दिवस दिनेश लेनगुरे यांनी गायन केले तर तब्बल वादक गणेश ठेंगणे, पॅड वादक प्रकाश ठेंगणे, हार्मोनियम वादक संजय मेश्राम यांनी केले सदर या काकडा आरती व संगीतमय भागवत सप्ताह समाप्ती दिंडीमध्ये गावातील गुरुदेव सेवा भजन मंडळ, सती सोना माता महिला भजन मंडळ, बिरसा मुंडा महिला भजन मंडळ व बालगोपाल यांनी सहभाग घेतला होता सदर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मारुतराव काळे, हरिभाऊ ठेंगणे, गुणवंतराव महाजन, गजानन पवार यांच्यासह गावातील पुरुष महिला व बालगोपाल यांनी मोठे सहकार्य केले