रेती माफियाचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला? ,आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने वाढते हिम्मत!



पैनगंगा अभयारण्यातील बोरगाव बिट क्रमांक ४८३ मधील नाल्यातुन अवैध रेतीची वाहतुक करणाऱ्या रेती माफिया कडुन वनविभागातील कर्मचाऱ्यावर हल्ला? झाल्याची जोरदार चर्चा बंदी भागात होत आहे
पैनगंगा अभयारण्यात मौल्यवान वस्तू चा खजाना असल्याने याचे जतन करण्याची जवाबदारी वनविभागावर असुन यांच्या हद्दीतुन काही नेण्याची परवानगी कोणालाही नसतांनाही मागील दोन वर्षांपासून या वनविभागाच्या हद्दीतील नाल्या वरुन रेतीची अवैध तस्करी वाढल्याचे पाहवयास मिळत आहे.
त्याला कारणही तसेच आहे तस्करा कडुन वनविभागातील काही महाभागांना आर्थिक रसद पोहचवली जात होती. त्यामुळे रेती माफिया मस्त मवाल झाले होते. ते कोणालाच जुमानत नव्हते परंतु दि १८ सोमवार च्या रात्री बिट क्रमांक ४८३ मधील बोरगाव – भवानी च्या नाल्यातुन दोन ट्रॅक्टर रेतीची चोरी करत असल्याचे गावातील लोकांनी वनविभागातील एका कर्मचाऱ्याला सांगितले त्यासुचने प्रमाणे तो नाल्या वर पोहचला व रेती चोरीस मज्जाव केला तर पत्रकारीचा मुखवटा लावुन रेती तस्करीत उतरलेल्या रेती माफियाने आम्ही तुम्हाला आर्थिक सहकार्य करतो तरी तुम्ही आम्हाला रेती उपसा करतांना कसे अडवु शकता असा प्रती प्रश्न करुन त्या वनविभागाच्या कर्मचाऱ्याला चांगलीच हाणामारी करुन ट्रॅक्टर अंगावरून घालण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता तो वनविभागातील कर्मचारी आपल्या विरोधात दराटी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करेल या भिती पोटी पत्रकारीचा बुरखा पांघरलेल्या रेती माफिया ने आपले राजकीय वजन वापरून गावातील महिला मंडळींना त्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी दराटी पोलिस स्टेशनला पाठवले होते अशी जोरदार चर्चा आहे. सदर संपूर्ण घटने सह हाणामारी ची बंदी भागात जोरदार चर्चा सुरू आहे.
याघटनेची माहिती घेण्याकरिता क्षेत्र सहाय्यक फुलसावंगी वर्तुळ व वन परिक्षेत्र अधिकारी महागाव यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही.
———-


▪️ सदर घटनेची चर्चा ऐकली परंतु फिर्याद द्यायला अद्याप पर्यंत कोणीही पोलिस स्टेशनला आले नाही.
संजय मातोडकर
ठाणेदार दराटी पोलिस स्टेशन