सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.सीमाताई विशाल आवारी तर वणी तालुका अध्यक्षपदी तात्याजी पावडे यांची नियुक्ती

प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी


सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य च्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी पुरड(ने) येथील लोकनियुक्त सरपंचा सौ सीमा विशाल आवारी यांची नियुक्ती करण्यात आली आधी त्या तालुका अध्यक्ष होत्या वणी,झरी मारेगाव तालुक्यातील कामगिरीच्या आधारावर त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर पिंपरी कायर येथील सरपंच तात्याजी पावडे यांची ग्रामीण विकासातील अनुभव बघता त्यांची वणी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यांत आली.जिल्हा व तालुक्यातील सरपंच यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघ यवतमाळ अध्यक्षा वर्षाताई निकम यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन जवाबदारी देण्यात आली.त्यांनी आपल्या नियुक्तीच्या श्रेय राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे राज्य संपर्कप्रमुख राहुल उके भाऊसाहेब कळसकर किशोर धामंदे व तालुक्यातील सरपंच महोदयांना दिले.