
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
भारतीय स्टेट बँक राळेगाव तर्फे ग्रामपंचायत आष्टा येथे पिक कर्ज नुतनीकरण महोत्सव मेळावा घेण्यात आला.त्यामध्ये थकीत राहून आपल्या सिबिल वर काय परिणाम होतात,व कोणत्याही बँकेचे कर्ज मिळण्यास किती त्रास होतो ,नियमित कर्ज भरणे किती फायद्याचे आहे हे स्टेट बँक चे फिल्ड ऑफिसर श्री रविकांत वेले सर यांनी सर्व शेतकरी बांधवांना पटवून दिले.यावेळी यवतमाळ रिजनल ऑफिस चे चीफ मुख्य प्रबंधक श्री लक्ष्मनजी महातो सर यांचे व राळेगाव शाखेचे शाखा प्रबंधक श्री पंकज जी पांगारकर सर यांचे मार्गदर्शन पर माहिती सर्व शेतकरी बांधवांना मिळाली. यावेळी ग्रामपंचायत आष्टा चे सचिव श्री मनीषजी वडे ,सरपंच सौ सोनूताई तोडासे,उपसरपंच श्री सुनीलजी पारिसे,कर्मचारी प्रविणजी नंदरे,स्टेट बँक चे श्री परागजी गिरी,हरीशजी गडदे,गजाननजी खडसे,योगेशजी ढोले व समस्त गावकरी यांनी खूप सहकार्य केले व आष्टा गावातील १००% नुतनीकरण 10 % वाढीव मध्ये करण्यात आले.
