माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके साहेब व जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ मानकर यांच्या नेतृत्वात राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

गेल्या पाच ते सहा दिवसात राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे आण‌ि इतर नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारला राळेगाव तहसीलदारांना भेटून निवेदन दिले.
गेल्या चार-पाच दिवसात जोरदार कोसळलेल्या पावसाने सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. तर कापूस शेतात भरपूर पाणी साचून राहिल्यामुळे रोपे कुजण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. आधी पाऊस नव्हता म्हणून व आता अतिवृष्टी झाली म्हणून शेतकरी चिंतेत आहेत.
जुलै 2022 च्या दुसऱ्याच आठवड्यात राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन ईतर पीकपाणी पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.राळेगाव तालुक्यातील अंदाजे ३०० ते ४०० हेक्टर शेतजमीन सतत चार-पाच दिवस पाण्याखाली राहिल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी यांना तहसीलदारांनी आदेश द्यावेत आण‌ि जागेवर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी केली गेली आहे.यावेळी माजी शिक्षणमंत्री वसंतरावजी पुरके, काँग्रेस कमेटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर,ओ.बी.सी सेल जिल्हाध्यक्ष अरविंदजी वाढोनकर,तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुने,नगराध्यक्ष रवींद्र शेराम,उपनगराध्यक्ष जानराव गिरी,मिलिंद इंगोले,अंकुश मुनेश्वर, कुंदन कांबळे, गजानन पाल,अमरसिंग गहलोत, प्रफुल्ल तायवाडे, केशवराव पडोळे,, विनायक बरडे, अंकित कटारिया, हमीद पठाण, कृष्णराव राऊळकर, पंकज गावंडे, मंगेश राऊत,राहूल होले, आशिष महाजन,अफसर अली सैय्यद,अशोक काचोळे,बी.यु.राऊत,बादशाह काझी,अंकीत कटारिया,किशोर धामंदे,राजू पुडके, निलेश हिवरकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.