राळेगाव तालुक्यातील झाडगाव सोसायटी अध्यक्षपदी आशिष कोल्हे तर उपाध्यक्ष पदी अकुंश रोहणकर यांची निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव ग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या १९ मे रोजी झालेल्या अध्यक्ष निवडणुकीत आशिष शशिशखर कोल्हे यांची एक मताने निवड करण्यात आली असुन तसेच उपाध्यक्ष पदी अकुंश रोहणकर यांची निवड करण्यात आली. त्यामुळे गटाच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या गटाचे बारा उमेदवार अनपोज निवडून आले होते आज रोजी सर्वानुमते अध्यक्षा ची निवड प्रक्रिया पार पडली असता आशिष कोल्हे व अकुंश रोहणकर यांनी सर्वांचे आभार मानले.

यामध्ये जिल्हा परिषद सदस्य वरध चित्तरंजन कोल्हे प्रमोद ढुमणे रोशन कोल्हे राजु भोयर आशिष कोल्हे रामचंद्र धोटे मनोज देशपांडे दामोधर महाजन शेखर ढाले शामराव पारीसे सौ मिनाताई पाल सौ सिंधुताई वाणी यांनी निवडी करीता सहकार्य केले तर सरपंच बाबाराव किन्नाके नंदु तागडे वासुदेव तिजारे वासुदेव पाल सचिन राडे सुरेश ब्राह्मणवाडे कवडु कुबडे मधुकर देशमुख यांनी पुष गुच्छ देऊन स्वागत केले.