
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात न्यायालयाचे दणक्याने सध्या सर्वत्र ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या निवडणूका लागल्या आहेत.प्रारंभी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येते.यातच संस्थेचे सभासद आहेत,ते कर्जदार ही आहेत परंतु थकीत आहे अशा सभासदांचे यादीत नाव नाही.आणी ज्या लोकांना संस्थेसोबत काही देणेघेणे नाही,जे शेतकरी ही नाही अशा नामधारी निश्क्रीय सभासदांचे नावे यादीत आहे.
एखादा शेतकरी नियमित कर्जदार आहे परंतु नेमके निवडणूक चे आधी थकीत असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नाही,हा अन्यायच आहे.कर्जदार, गैरकर्जदार या दोघांचेही मत मुल्य सारखेच असल्याने आणि गैरकर्जदारांची संख्या अधिक असलेल्या संस्था गैरअर्जदारांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.
