आधी तुझं माझं जमेना अन आता तुझ्या वाचून करमेना {लोक न्यायालयातून झाली कौटुंबिक जुळवणी}

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण न्यायालय राळेगाव तसेच वकील संघ राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या लोकन्यायालय आतून कुटुंबातून ताटातूट झालेल्या कुटुंबाची जोडूनी होऊन पती-पत्नी गुण्यागोविंदाने नांदायला लागले असून ” आधी तुझं माझं जमेना अन आता तुझ्या वाचून करमेना” अशी अव्यस्था पती पत्नीची झाली आहे.
विधी सेवा प्राधिकरण मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर लोकन्यायालय संपन्न झाले असून राळेगाव येथील लोकन्यायालयात एकूण ८५ प्रलंबित खटले सोडण्यात आले त्यात दंडाच्या रुपात २५ हजार रुपये वसूल करण्यात आले. सुरुवातीला न्यायालयाच्या विधी सेवा समिती मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती न्यायाधीश विजय जटाळ यांनी दिली वाद पूर्व खटले कौटुंबिक वाद जागेचे वाद बँकेची प्रकरणे ग्रामपंचायत ची प्रलंबित प्रकरणे आपसी समझोता करून त्यातून सोडवण्यात आले यावेळी न्यायाधीश विजय जटाळ न्यायाधीश भूषण नेरलीकर पॅनल सदस्य प्रा अशोक पिंपरे ऍड मधुसूदन अलोणे ऍड प्रफुल्ल चव्हाण ऍड मोहन देशमुख यांनी काम सांभाळले तर अधीक्षक अरुण खंडारे. राजेश भास्करवार . अजय चांदुरकर. विशाल डाफ अरुण पारधी सुंदरदास मेश्राम यांनी सहकार्य केले.