आपटी रामपूर ग्राम विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अनिल दाणे तर उपाध्यक्षपदी अर्चनाताई शशिशेखर कोल्हे

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील आपटी रामपूर ग्राम विविध कार्यकारी संस्थेत डोंगरगाव,खडकीसुकळी या तीन गावाचा समावेश आहे. या सोसायटीचे संचालक म्हणून प्रभाकरराव पटेलपैक,गणेश राजेश्वरराव तुरणकर, निलेश एकोणकर,अनिल दाणे,वैभव भोयर, तुळशीराम राऊत,विठ्ठल आत्राम,विजय रोहणे सौ.संजिवनी कुंटे,श्रीमती अर्चनाताई कोल्हे, भास्कर आत्राम,अनिल पिंपरे यांचीअविरोध निवड झाल्यानंतर आज दिनांक 9/6/2022 रोजी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली.त्यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी डोंगरगाव रहिवासी तथा सोसायटीचे संचालक श्री अनिल दाणे यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सहकार क्षेत्रातील नेते स्व.शशिशेखर कोल्हे यांच्या पत्नी तथा तरूण युवकांचे नेतृत्व आशिष कोल्हे यांच्या आई श्रीमती अर्चनाताई शशिशेखर कोल्हे यांची निवड करण्यात आली स्व शशिशेखर कोल्हे यांच्या उपस्थितीत त्यांच्या ताब्यात असलेल्या सोसायटीवर असलेली पकड त्यांचे राजकीय वारसदार त्यांचे चिरंजीव तथा झाडगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा तालुक्यातील युवा नेतृत्व आशिष शशिशेखर कोल्हे यांनी कायम ठेवली असून या झालेल्या निवडीच्या वेळी सोसायटीचे सर्व संचालक व गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.