
तालुका प्रतिनिधी:–रामभाऊ भोयर(9529256225)
सावरखेड येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा आहे. याच शाखेला पस्तीस गावांचा व्यवहार जोडलेला आहे. ग्रामीण भागातील लोकांना व्यवहाराची सुलभता व्हावी या हेतूने ही शाखा स्थापन व्हावी या साठी गत काही नेत्यांनी प्रयत्न केले परंतु बँकेच्या या शाखेकडून सर्वसामान्याला न्याय देण्या ऐवजी अन्यायच होत असून आम्ही म्हणू तोच कायदा अशी वृत्ती येथील कर्मचारी वर्गाची झाली असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात शेती हा महत्वाचा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांची सद्यस्थिती भयावह आहे. कर्ज घेतल्या शिवाय शेतकरी शेती करुच शकत नाही ही वस्तूस्तीती आहे. या वर्षी कर्ज वाटपाचे असलेले उद्दिष्ट्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी पूर्ण केलेच नाही. उलट शेतकऱ्यांना वेठीस धरून चकरा मारायला लावण्याचे काम बँक व्यवस्थापक कर्मचारी करतात. या बँकेत दोनच कायम कर्मचारी आहेत व इतर रोजनदारीत असलेले कर्मचारी आहेत. बँकेत कर्मचाऱ्यांनी कधीही यावे व कधीही जावे, याला नियम नाही. कधी आठ दिवस केव्हा पंधरा दिवस कनेक्टिव्हिटीच नसते. शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे बरीच प्रलंबित आहेत. सामान्य तरुण जो मुद्राचे लोण घेऊन छोटासा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभराहून कुटुंबातील इतरांना मदत करावी असा विचार करतात, अशा तरुणांकडून मागील कर्ज भरून घ्यायचे व पुन्हा कर्ज मागणी केली असता होत नाही. ही उत्तरे बँकेच्या प्रमुखाकडून होत आहेत. अशी तक्रार काही तरुण व शेतकऱ्यांची आहेत. दिनांक १२ जुलै सोमवारी बँकेच्या सावरखेड शाखेत दुपारी बारा वाजले तरी एकही कर्मचारी नव्हता, रोजनदारीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बँक उघडली. बँकेमध्ये ग्रामस्थ गेले असता कोणीच दिसले नाही. ज्यांच्या भरोषावर बँक चालतात त्यांच्याच नशीबी हेलपाटे खाणे आले आहे. अशी खंत सावरखेड येथील नागरिकांनी व्यक्त केली असून सामान्य शेतकरी कष्टकरी, तरुण बेरोजगार यांना त्रास देणाऱ्या सावरखेड शाखेकडे संबंधित अधिकारी व सन्माननिय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष देईल का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
