
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 रोजी महात्मा गांधी जयंती पासून राळेगाव तालुक्यातील धानोरा मंडळातील सावंगी (पे), अंतरगाव, चिखली (व), उंदरी, धानोरा या साज्याअंतर्गत सर्व गावांमध्ये खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच 7/12 उतारा चे वाटप करण्यात आले. महसूल विभागाने संगणकीकृत 7/12 नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला असून आता दोन ऑक्टोंबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती पासून या सुधारित 7/12 उतारा ची पहिली प्रत मोफत थेट खातेदारांच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.धानोरा गावात सुधारित 7/12 उतारा ची पहिली प्रत देण्यासाठी मंडळ अधिकारी निनावे साहेब व पटवारी तिरणकर साहेब व अंकित पाटील हे उपस्थित होते.
