वरूड ज.ग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकित परिवर्तन पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील महत्वाची मानली जाणारी ग्राम विविध कार्यकारी सोसायटी वरूड जहागीर येथील सर्व जनतेने एक हाती सत्ता दिल्याचे दिसत आहे, त्यामध्ये विजयी उमेदवार पुरुषोत्तम मंगल राठोड,प्रकाशराव पंजाबराव पाल, बेबीताई बबन राठोड, बबीता नरेंद्र चव्हाण, अंकुश किसन चव्हाण, विलास किसन खैरी,महादेव राऊत, जयवंत सदाशिव मोरे ,उद्धव नेहारे, तुळशीदास नारायण कोवे,भोरे सुदाम गंगाराम,वसंता गडबडसा आडे यांचा बहुमताने विजयी झालेले आहे, तर प्रतिस्पर्धी यांचा दणदणीत पराजय झाला असल्याने गावात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.