
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील मोठ्या सोसायटी पैकी एक असलेल्या कीन्ही जवादे सोसायटीच्या निवडणुकीत सुधीर जवादे यांच्या”सर्वजन युवक सहकार पॅनल”ने विजय मिळवला होता.आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी इंजिनिअर आदित्य सुधीर जवादे व उपाध्यक्षपदी दामोधर खापणे यांची अविरोध निवड झाली.”उच्चशिक्षीत युवा अध्यक्ष झाल्यामुळे राळेगाव तालुक्यातील राजकारणात शिक्षित युवकांचा सहभाग वाढेल “असा विश्वास डॉ शशीकलाताई भालचंद्र जवादे यांनी व्यक्त केला.नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचे मनोहरराव ठाकरे, नामदेवराव मोहुर्ले विजुभाऊ, वाढई, देवेंद्र उईके, बबनराव मांडवकर, प्रकाश डाहुले, दशरथ मोहुर्ले, सदाशिवराव खैरकार जानकीदास वाढई पुंडलिक लोणबले, गौरव चवरडोल, विलासराव क्षीरसागर यांनी अभिनंदन केले.
