
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)
ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव ता. राळेगाव जी. यवतमाळ येथील विद्यार्थ्यांची नवोदय करिता निवड झाली. नवोदय विद्यालय समिती अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालयाच्या वर्ग 5 वि. च्या प्रवेशा करिता दरवर्षी घेतल्या जाणार्या परीक्षेत, याही वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यात 1)साई उंबरकर, 2) तन्वी कोकरे व मार्कंडेय पब्लिक स्कूल कळंब येथून 1) श्वेत भालकर या विद्यार्थ्यांची निवड झाली असून मिळालेल्या यशाचे श्रेय मुलांनी शाळेच्या शिक्षकांना तसेच पालकांना दिले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ . संतोष कोकुलवार व संस्थेचे सचिव डॉ. शीतल बलेवार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
