
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
आज रोजी रावेरी येथे नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने नुकसान झालेल्या रावेरी, चिकना येथील २७ गरजूंना जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान संस्थेकडून रावेरी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, राळेगाव तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या पावसाची १४७ मीली नोंद झाली त्यामुळे रामगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले,त्याच प्रमाणे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरून घरांमधील धान्य व इतर जीवनोपयोगी साहित्य वाहून गेले व घरांची पडझड झाली, रामगंगा काठावरील रावेरी व इतर अनेक गावांतील लोकांची भरपूर हानी झाली असून रावेरी व चिकना येथील एकूण २७ गरजुना जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान तर्फे जीवनावश्यक किट देण्यात आली त्या मध्ये दैनंदिन जीवनात आवश्यक असलेला सर्व वस्तू नितीन नार्लावार,सोनी सर,सचिन आसावार,सुनील भेले, राहुल वनकर यवतमाळ, रावेरी येथील उपसरपंच गजानन झोरींग, नरेंद्र काकडे, मनोज गडबैल यांचे हस्ते वाटप करण्यात आले, या प्रसंगी गावातील बरेच मंडळी हजर होती.
