
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
.
राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे एकाच विहिरीत दोन भावाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चहांद येथील शाम ज्ञानेश्वर धोबे वय २२ वर्ष याने २७ फेब्रुवारी रोजी गावालगत असलेल्या धनंजय जवादे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती तर दोन दिवसाने दुसऱ्या भावाने त्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे सदर दुसऱ्या भावाचे नाव राहुल ज्ञानेश्वर धोबे वय २७ वर्ष यांनी २ मार्च रोजी लहान भावाने ज्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती त्याच विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सदर या घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळताच वडकी पोलीस घटनास्थळी पोहचून
पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदणासाठी राळेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेने धोबे कुटुंबावर दुखः चा डोंगर कोसळला आहे सदर दोन्ही भावाचे आत्महत्तेचे कारण अध्यापही कळले नसून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहेत
