मनसे तालूका संघटक जयंत कातरकर यांनी बांधले शिवबंधन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

यूवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यूवासेना सचीव वरूण सरदेसाई,राजीव दिक्षीत यूवासेना संपर्क प्रमूख, अभिनंदन मूनोत यूवासेना जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक जयंत कातरकर यांनी शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून शिवसेना यूवासेनेत जाहीर प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी हिंगणघाट तालुक्यातील मनसेचे जिल्हाध्यक्ष अतूल वांदिले यांनी मनसेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.जयंत कातरकर यांची राजकीय कारकीर्द ही शिवसेनेपासूनच सूरू झालेली होती.ग्रामीण भागामध्ये जयंत कातरकर यांनी शिवसेना गावागावात पोहचवित पोहणा-पिपरी सर्कलमध्ये शिवसेना वाढविली पण काही कारणास्तव काही वर्षांपूर्वी शिवसेना सोडून गेलेले,मनसे तालूका संघटक जयंत कातरकर यांची घरवापसी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
जयंत कातरकर यांच्या शिवसेना यूवासेनेमध्ये पक्ष प्रवेशाने हिंगणघाट तालुक्यात पक्षाला बळकटी मिळण्यास नक्कीच मदत होईल.