
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.निष्पाप काही महिन्यापासून शेतकरी शांततेने आंदोलन करत होते. संपूर्ण देशाने घडलेली पाहिली आहे गुन्हेगारांनी गाडी कशी चालवली आणि त्या घटनेत चार शेतकऱ्यांना मारले गेले व त्यांना चिरडले गेले.असे अमानुष आणि लज्जास्पद कृत्य भारताच्या सुसंस्कृत परंपरेला डाग आहे.स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच भारतीय संस्कृती समृद्ध करण्यात शेतकऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.परंतु ११ महिन्यांपासून ते केंद्र सरकारने केलेल्या ३ काळ्या कायद्यांमुळे शेतकरी अडचणीत आहेत मात्र देशाचे पंतप्रधानांना शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही.या घटनेत मुख्य सहभागी कॅबिनेट राज्य मंत्र्याच्या मुलगा या कृत्याबद्दल तिव्र निषेध करण्यात आला.तसेच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी व एन.एस.युवा.आयचे राष्ट्रीय अध्यक्ष निरज कुंदन यांच्या अटकेचा यावेळी निषेध करण्यात आला.या संपूर्ण घटनेला दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनातुन NSUI केली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के,जिल्हा सचिव सुफियान जावेद अन्सारी,सन्नी आगळे,संकेत साठे,राम आर्य,तहुर अहमद,शाजेब हसन,कामरान खान या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
