करंजी ( सो ) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ पंचायत समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.प्राथमिक शाळा करंजी शाळा पूर्व तयारी मेळावा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

करंजी ( सो )
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ पंचायत समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
जि.प.प्राथमिक शाळा करंजी ( सो ) येथे आज बुधवार दि. २०-४-२०२२ रोजी नवीन विद्यार्थ्यांन करिता शाळापूर्व तयारी मेळावा चे आयोजन करण्यात आले मेळाव्या मध्ये पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना सामाजिक आणि मानसिक विकास,बौद्धिक- विकास,भाषा विकास,शारीरिक विकासाच्या दृष्टीने अंक ओळख, अक्षर ओळख,फळ भाजी ओळख आकृती ओळख अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रुपाली कन्नाके मॅडम व शिक्षक श्री.स्वप्निल कुदुसे सर यांनी केले
या वेळी सरपंच प्रसाद ठाकरे,शाळा समिती अध्यक्ष विजय देठे,उपाध्यक्ष रेश्माताई खडसे,शिक्षण प्रेमी सुधीर घुगरे,शुभांगी ताई कुमरे,दत्त खडसे विद्यार्थी व पालक उपस्थित होते.