शिवाजी नगर वासियांना घरकुलाचा लाभ अद्यापही मिळाला नाही,५ नागरिकांनी दिले तक्रार निवेदन

t

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

शिवाजी नगर राळेगांव प्रभाग क्रमांक तेरा मधील नागरिकांना अद्यापही घरकुलाचा लाभ अद्यापही मिळाला नाही,सर्व अटीची पुर्तता करुन प्रत्येक नागरिकाला घरकुलं द्या वे अशी रास्त मागणी तक्रार निवेदना द्वारे मुख्याधिकारी नगर पंचायत राळेगांव यांना केली आहे. सर्वासाठी घरे २०२२ या शासन निर्णय नुसार याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे,अतिक्रमण नियमाकुल करुन घरकुलं द्या वा अशी शासकीय योजना आहे.
येथे सन् १९९५ पासून नागरिकांनी अतिक्रमण करुन वास्तव्य करत आहे.नियमानुसार जागेचे पट्टे मिळाले नाही म्हणून शिवाजी नगर राळेगांव प्रभाग तेरा येथील नागरिक घरकुला पासून वंचित आहे.नगर पंचायत राळेगांव कडून घरकरा सह इतर कर वसूल होत आहे, शौचालयाचे लाभ मिळाला,ग्रामपंचायत अस्तित्वात असताना अनुसूचित जाती जमाती च्या नागरिकांना घरकुलं मिळाली पण नवनिर्मित नगर पंचायत कडून जागेचे पट्टे नसल्याने घरकुलं मिळाली नाही.
शासकीय स्तरावर सर्व कारवाई करुन जागेचे पट्टे देऊन घरकुलाचा लाभ द्या वा,अन्यथा दोन महिन्यानंतर नगर पंचायत राळेगांव समोर आमरण उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे. यावेळी निवेदन देतांना देवराव नाखले,गणेश भोज,सुमित नेहारे,निलेश बचाटे,देवा मंगाम,निखिल तोडासे,पंकज शेलवटे,तुषार नेहारे,अनिकेत नारनवरे,गणेश ठाकरे,अक्षय कावळे सह अन्य मान्यवर उपस्थित होते….