धमकीप्रकरणी कारवाईसाठी ग्रामसेवक संघटनेचे निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

काल रोजीप्रसारित झालेल्या वृत्तपत्रातून बातम्यांची दखल घेत ग्राम सेवक सांगताना राळेगाव यांनी निवेदन देवून ग्रामपंचायत आष्टोना येथील कार्यरत ग्रामसेवक श्री. विलास सोनुले यांना दि. 08/03/2022 रोजी फोन द्यारे जीवे मारण्याची धमकी दिले बाबत गैर अर्जदार नरेश मधुकर चटकी यांचे विरुद्ध दि.09/03/2022 ला दिलेली लेखी तक्रार

वरून आष्टोना येथिल कार्यरत ग्रामसेवक श्री, विलास सोनुले व ग्रामपंचायत अंगणवाडी बांधकाम करिता आरक्षित केलेल्या जागे वरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही पूर्ण केली व त्या मध्ये मधुकर चटकी त्यांचे सुध्दा अतिक्रमण काढण्यात आले त्यामूळे गैर अर्जदार नरेश मधुकर चटकी यांनी ग्रामसेवक यांना फोन द्यारे जीवे मारण्याची धमकी दिली त्या अनुषंगाने ग्रामसेवक श्री, विलास सोनुले यांनी दि. 09/03/2022 ला पोलीस स्टेशन ला धमकी तक्रार दिली आहे परंतु त्या अनुषंगाने गैर अर्जदार श्री नरेश मधुकर चटकी यांच्या वर अजूनपर्यंत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली नाही तरी आपण योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा ग्रामसेवक संघटना र. ज.न. DNE136 शाखा राळेगाव यांच्या तर्फे काम बंद आंदोलन करण्यात येईल करिता आज रोजी पोलीस अधिकारी वडकी यांना निवेदन सादर करण्यात आले.