नेताजी विद्यालय राळेगाव येथे कोरोना लसीकरण तसेच कोरोना वोरिअर्स यांचे कडून आजारा संदर्भात मार्गदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दि 6 जानेवारी ला नेताजी विद्यालय राळेगाव येथे कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. 15 ते18 वर्ष वयोगटातील 49 विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले .”जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा” अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी श्री पाटील सर आणि नीलिमा चौधरी मॅडम यांनी कोविड लसीकरण आणि आजार या संदर्भात इत्यंभूत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कोविड आजाराबाबत विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली तसेच आरोग्यसेविका चौधरी मॅडम व अलोने मॅडम या सावित्रीच्या लेकींचा सत्कार करण्यात आलाया कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती केवटे मॅडम आणि वानखडे मॅडम यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री ओंकार सर होते. संचालन विद्यार्थिनी राणी पाल व समीक्षा बातूलवार हिने केले या कार्यक्रमाला सहायक शिक्षक श्री विलास कुबडे, श्री श्री दिलीप कोकाटे, श्री मनोहर बोरकुटे, श्री रामदास आत्राम श्री दिवाकर लिलहारे, सहायक शिक्षिका सिडाम मॅडम, चावट मॅडम, सोनोने मॅडम, नागरे मॅडम यांची उपस्थिती होती शिपाई सचिन पांडे याने कार्यक्रम यशस्वीतेसाठी साठी अथक परिश्रम घेतले.