माझ्या मुलाची सायकल का अटकावली या कारणावरून वाद करून लाकडी काठीने मारहाण-वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत विहिरगाव येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विहिरगाव येथील सायकल ने ठोस मारल्याचे कारणावरून सायकल अटकावली असल्याने माझ्या मुलाची सायकल का अटकावली या कारणावरून शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना दि 6 ऑगष्ट रोजी घडली.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार यातील मोरेशवर उदयभान उईके वय वर्ष 55 रा विहिरगाव हे आपल्या शेतातून घरी येत असताना गावातीलच कवडू साधुजी उईके वय वर्ष 45 रा विहिरगाव याचा मुलगा लाल याने त्याच्या सायकलने मोरेशवर उईके याना समोरून येऊन ठोस मारल्याने मोरेशवर यांनी तुला सायकल चालवता येत नाही का असे म्हणून त्याची सायकल हिसकावून घराकडे घेऊन जात असताना कवडू उईके याचा मुलगा लाल मागे मागे येत असल्याने मोरेशवर याने मुलाला समजावून सायकल परत दिली,त्यानंतर काही वेळाने मुलाचे वडील कवडूजी उईके याने गावातीलच येरमे यांचे पानठेल्याजवळ येऊन मोरेशवर उईके यास तू माझ्या मुलाची सायकल अटकावली होती असे म्हणून वाद केला व शिवीगाव करून काठीने मोरेशवर यास मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली,याप्रकरणी मोरेशवर उईके यांनी दि 7 ऑगष्ट रोजी दुपारच्या सुमारास वडकी पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली असता वडकी पोलिसांनी आरोपीवर सदरचा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आज दि 8 ऑगष्ट रोजी पोलिसांकडून देण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.