राळेगाव तालुक्यात गुलाबी बोंडअळी ,शेतकरी चिंतेत

1

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

जून महिन्यातच चांगल्या पावसाची सुरुवात झाल्याने यावर्षी शेती हंगाम चांगला राहील असे शेतकऱ्याला वाटत होते योग्य वेळी पाऊस पेरणी फवारणी खत सगळं झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु शेतकऱ्याच्या या आनंदावर गुलाबी बोंड अळी ने नांगर फिरविला असून कपाशी लावणाऱ्या शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे गुलाबी बोन्डअळीने गेल्या वर्षी सारखेच याही वर्षी मोठे क्षेत्र घेतल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट येईल सलग दोन वर्षे गुलाबी बोन्ड अळी कपाशीचे नुकसान करीत असल्याने कपाशी उत्पादक शेतकरी मात्र देशोधडीला लागेल एवढे निश्चित।।। तालुक्यातील निधा येथील प्रगतिशील शेतकरी डॉ ज्ञानेश्वर मुडे यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबीबोंड अळी दिसून आली आहे यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ज्ञानेश्वर मुडे यांनी आपल्या शेतात नेहमीप्रमाने विविध कंपनीचे बियाण्याची लावण केली योग्य प्रमाणात खत योग्य प्रमाणात फवारणी . निंदन. डवरने इत्यादी सर्व सोपस्कार पार पाडले दोन ते अडीच फूट कपाशी आली .कंपाशीला पाती व फुलही लागली मात्र फुलांमध्ये त्यांना गुलाबी बोंड अळी दिसली यामुळे त्यांचे पीक धोक्यात आले आहे गुलाबी बोंडअळी मुळे गेल्या वर्षीच तालुक्यातील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते कपाशीचे एकरी दोन क्विंटलही उत्पादन शेतकऱ्यांना झाले नव्हते गुलाबी बोन्डअळी पिकाचे किती नुकसान करते हे शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी पाहिले आहे आणि यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच गुलाबी बोन्डअळी आल्याने शेतकऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत कपाशी हे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून यावरच त्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन असते ज्ञानेश्वर मुडे यांनी आपल्या सत्तावीस एकरात कपाशीची लागवड केली आहे त्यांच्या दहा एकराच्या फुलावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसतो त्यामुळे त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे रीतसर तक्रार केली आहे .कंपनीचा दावा फोल।।कपाशीच्या लागवडीनंतर 90 दिवसा पर्यंत म्हणजे तीन महिने पर्यंत पिकावर कोणतीही रोगराई येणार नाही असा कंपनीचा दावा असतो मात्र डॉ मुडे यांच्या शेतात कपाशीची लागवड करून फक्त 45 ते 60 दिवसाचा कालावधी झाला आणि त्यावर बोन्डअळी आली यामुळे बियाणे कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली असे मुडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे तसेच गेल्या दोन तीन वर्षांपासून आपल्याकडे गुलाबी बोन्ड अळी येत आहे कंपन्यांच्या सीड प्लॉटवरतीही गुलाबी बोन्डअळी येतच असेल तरी कंपन्या तेच बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे कम्पम्यांनी नवीन बियाणे शेतकऱ्यांना द्यावयास हवे पण जुनेच बियाणे कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे व शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे .कृषी अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष।। ज्ञानेश्वर मुडे यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे कडे रीतसर तक्रार करून सुद्धा कृषी अधिकारी कार्यालयाने त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही शेताची पाहणी करतो अश्या तोंडी सूचना देऊन तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ अधिकारी शेतात पोहोचलेच नाही परिणामी आजूबाजूचे शेतकरी चिंतेत पडले आहे गेल्यावर्षी तालुक्यात गुलाबी बोन्डअळीने इतके नुकसान केले त्यामुळे यावर्षी कृषी विभागाने हंगामाच्या सुरवातीपासूनच गुलाबी बोन्डअळीच्या व्यवस्थापनासाठी कंबर कसावयास हवी होती पण अशी तयारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समितीचा कृषी विभाग या दोन्ही कृषी विभागाकडून कुठेही दिसली नाही गुलाबी बोन्डअळीचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कुठलेही मार्गदर्शन करण्यात आले नाही याबतीत कृषी विभाग पूर्णपने फेल झाला आहे।।।पत्रकार संघटना व तहसीलदार यांनी घेतला पुढाकार।।।तालुक्यात गुलाबी बोन्डअळीचा शिरकाव झाला असे समजताच याबाबत माहिती घेण्यासाठी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी कृषी अधिकारी कार्यालयात गेले असता तेथे फक्त दोन कर्मचारी उपस्थित होते नंतर पत्रकारांनी तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे यांची भेट घेऊन बोंड अळीच्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे अशी विनंती केली तहसीलदार यांनी यावर तातडीने पावले उचलत मंगळवारी तहसील कार्यालयात गुलाबी बोंड अळी बद्दल पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांची बैठक आयोजित केली आहे मात्र प्रशासनाने वेळीच उपाययोजना केली नाही तर तालुक्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढून शेतकरी संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही एवढे निश्चित।।