महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने राळेगाव शाखेकडून पंचायत समिती कार्यालयाच्या पटांगणात समाज उपयोगी असा वृक्षारोपण

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225)

अन्यायाची चीड न्यायाची चाड त्याग आणि सेवा असे ब्रीद वाक्य व शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणारी राज्यातील एकमेव संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने राळेगाव शाखेकडून पंचायत समिती कार्यालयाच्या पटांगणात समाज उपयोगी असा वृक्षारोपण उपक्रम गटशिक्षण अधिकारी श्री लुकमान साहेब विस्तार अधिकारी
देवतळे मॅडम यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
या उपक्रमाला संघटनेचे अध्यक्ष तथा 109 चे संचालक श्री महेश सोनेकर सर तसेच कोषाध्यक्ष गोविंद धोटे सर ,सचिव प्रवीण थुल सर, राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष दिलीप चामाटे सर तसेच पुंडलिक देवतळे सर,विनायक एकोणकर सर ,विकास झाडे सर ,किरण देशमुख सर,श्याम ढुमने सर, प्रवीण दरेकर सर ,संदीप क्षिरसागर सर ,सागर धनाल कोटवार सर, हनुमान जुमनाके सर,हेमंत सिडाम सर,झिलपे सर,लोहवी मॅडम उपस्थित होते.