
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सद्यस्थितीत काही शेतामध्ये अजूनही कापूस वेचणी सुरू आहे पण कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नाही मिळाले तर मजुरी इतकी जास्त आहे की कापसाला मिळत असलेला भाव व द्यावी लागणारी मजुरी याचा हिशोब काढला तर अर्धे तुम्ही अर्धे आम्ही अशी सद्यस्थितीत कापसाची स्थिती आहे. अजूनही राळेगाव शहर तसेच परिसरात काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस वेचणी सुरू आहे काही शेतकऱ्यांनी आपल्या कपाशीला पाणी दिले होते तसेच मध्यंतरी काहीवेळा पाऊस झाला त्यामुळे यावर्षी कापसाचा हंगाम लांबला पण हंगामामध्ये कापूस वेचणीसाठी लागणाऱ्या मजुराची जशी स्थिती होती तशीच हंगाम संपत असतानाही कायम आहे अजूनही कापूस वेचण्यासाठी मजुर मिळत नाही शहरातील मजूर इतर गावात जातात व इतर गावातील मजुर राळेगाव मध्ये येतात ऑटो चालकांच्या मनमानी कारभारामुळे अशी मजुरांची संगीत खुर्ची अजूनही सुरूच आहेत मजूर हे शेतामध्ये एक दिवस कापूस वेचणी करतात मग पंधरा दिवस येत नाहीत पर्यायाने शेताला हात लावून ठेवतात सध्या मजुरीचे दर हे गगनाला भिडले आहेत 30 रुपये किलो प्रमाणे मजूर कापूस वेचत आहेत कापूस जर फुटून नसला तर तीनशे ते साडेतीनशे रुपये मजुरी एका मजुराला द्यावी लागते याशिवाय ऑटोचे भाडे वेगळे महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या कापसाला पाहिजे तसे दर मिळत नाहीत 7000 रुपयापासून कापसाला दर मिळतात त्यातही 30 रुपये किलो मजुराला द्यावे लागले व ऑटोचा जर खर्च पकडला तर जवळपास अर्धे पैसे मजुरीला द्यावे लागत आहेत इतकी मजुरी देऊनही मजुर मिळत नाही कापूस वेचण्यासाठी मजुर मिळत नसल्याने सुद्धा शेतीचा हंगाम या वर्षी लांबला आहेत कापूस फुठल्या नंतरही शेतकऱ्यांना पंधरा दिवस मजूर मिळत नाहीत कापसाचा हंगाम लांबण्यासाठी मजुर सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत शिवाय सद्यस्थितीत उन्हाचा पारा सुद्धा वाढलेला आहे दुपारी मजुरांना फार काम उरकत नाही त्यामुळे दोन दिवसात होणाऱ्या कामाला तीन दिवस लागत आहेत एरवी शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाच्या उलंगवाडी झाल्या आहेत पण काही शेतात अजूनही कापूस वेचणी सुरू आहे त्यांना मात्र जी मजुरी द्यावी लागते व त्या कापसाला मिळत असलेला भाव याचा हिशोब काढला तर मजुरांना अर्धे पैसे व अर्ध पैसे शेतकऱ्याला अशी सध्यस्तीतीतील कापसाची स्थिती आहे फुटलेला कापूस शेतात ठेवणे शक्य नाही कापूस वेचणे आवश्यकच असल्याने नाईलाजाने का होईना वाढीव मजुरी देऊन सुद्धा शेतकऱ्याला कापूस वेचने भाग पडत आहे कापसाच्या भावातील तेजीमुळे सुद्धा शेतकरी वाढीव मजुरी देऊन कापूस वेचत आहे.
