
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
येथील अगदी सामान्य कुटुंबातील एक तरुण मुलगा अक्षय अरुणराव ताकसांडे हा अविरत अभ्यास करून वयाच्या 26व्या वर्षीच upsc परीक्षा उत्तीर्ण करून भारत सरकार च्या गृह मंत्रालय सीमा सुरक्षा दल(bsf)डिपार्टमेंट मध्ये सहाय्यक कमांडेंट पदी नियुक्त होऊन त्यांनी बहुमान मिळविला या घटनेने त्यांच्या परिवारासह गावातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या, अक्षय ताकसांडे हा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका येथील रहिवासी असून त्यांनी शालेय जीवनात असतांना त्यांनी फक्त आणि फक्त अभ्यासाकडेच लक्ष करून सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न समोर ठेवले होते, विशेष मन्हजे 2020नंतर महाराष्ट्रातुन दोनच विद्यार्थी bsf या डिपार्टमेंट मध्ये लागले आहे, त्यात राळेगाव येथील अक्षय ताकसांडे हा एक 26वर्षीय मुलगा लागला आहे, 2020ला upsc परीक्षा पास झाल्यामुळे त्यांना डिपार्टमेंट(ac-dc-45) ने13महिन्याच्या ट्रेनिंग ला पाठविले होते 13महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण करून झाल्या नंतर दिनांक 27/10/2021रोजी त्यांचा डिपार्टमेंट मार्फत पासिंग आउट परेड व भारतीय संविधान साक्ष शपथ हा समारंभ ग्वालीयर येथे पार पडला असून सदर समारंभाला अक्षय ताकसांडे यांचे वडील, आई, बहीण,व भाऊजी उपस्थित होते त्याच वेळी अक्षय अरुणराव ताकसांडे यांची भारत सरकार च्या गृह मंत्रालय सीमा सुरक्षा दल bsf मध्ये सहाय्यक कमांडेंट पदी पोस्टिंग करण्यात आली पोस्टिंग तारीख 26/11/2021ही देण्यात आली.
