स्मिता तिमसे – कानडजे, लेखाधिकारी जलजीवन मिशन महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 1 परीक्षेत अकाउंट विषयात राज्यात प्रथम


राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
मो 9529256225


सौ. स्मिता कानडजे, लेखाधिकारी,जलजीवन मिशन, जि. प. यवतमाळ या पदावर कार्यरत असून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 1 विभागीय परीक्षा 2021 मध्ये प्रथम प्रयत्नात उत्तम यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे कठीण मानल्या जाणाऱ्या अकाउंट विषयात त्यांनी 100 पैकी 89 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या खात्या अंतर्गत परीक्षेत 800 पैकी 538 गुण मिळवून त्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी फौजदार म्हणून गाडगे नगर पोलीस स्टेशन अमरावती, तर विक्रीकर अधिकारी म्हणून यवतमाळ येथे यशस्वीरित्या कामकाज केले आहे. त्या बी. टेक. ऍग्री पदवीधर असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना परस बागेची विशेष आवड असून शासकीय निवासस्थानी त्यांनी सेंद्रिय भाजीपाला लागवड केला आहे. नोकरदार महिलांनी किचन गार्डनिंग, शेती आणि पर्यावरण कार्यात पुढाकार घेतला पाहिजे, यासाठी त्या नेहमी तत्पर असतात हे विशेष…