जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ढाणकी परिसराला भेट,पूरग्रस्त भागाची केली पाहणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिनांक 14 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता ढाणकी – बिटरगाव रस्त्यावरच्या आट्रीच्या नाल्याची पाहणी करून पुराच्या पाण्याने खरडून गेलेली जमीन व पिके यांची पाहणी केली.
मागील दोन दिवसांपासून ढाणकी परीसरात मुसळधार पाउस बरसल्याने नदी,नाले, दोही थडया वाहिल्यामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखालील तर गेलीच शिवाय आट्रीच्या नाल्याचे पाणी पुलावरून वाहू लागल्यामुळे सतत दोन दिवस रस्ता ठप्प झाला होता.त्यामुळे नागरीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.आज दिवसभर पावसाने उसंत घेतल्यामुळे आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा उमरखेड तालुक्यात पाहणी दौरा असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आट्रीच्या नाल्यावर जिल्हाधीकारी यांनी भेट घेवून अनेक समस्यांचा पाढा वाचला.नाल्याच्या दोन्ही बाजूंनी पुराच्या पाण्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले.नाल्याची खोलीकरण नसल्यामुळे दरवर्शीच नाल्याकाठच्या शेतजमीनीचे नूकसान होवून शेतकऱ्याची आर्थिक बाजू ढासळून जाते.हि बाबही त्यांच्या लक्षात आली.पावसाने उसंत घेतल्यानंतर लगेच नदी काठी व नाल्या काठील शेत जमीनीचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येतील.30 जुलै पर्यंत पिक विमा भरण्यासाठी अवधी आहे. आपल्या पिकाचा विमा न चूकता भरावा असे आवाहन ही केले

चौकट
यावेळी जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी व प्रहार जनशक्ती पाक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. क्षतीग्रस्त शेतकऱ्यांना शासनानी सरसकट मदत दयावी अशी मागणी वंचित च्या वतीने केली . तर प्रहार ने शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची निवेदणाद्वारे केली.