
राळेगाव प्रतिनिधी :रामभाऊ भोयर
राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार (ए आय एस एफ) अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ तसेच वैद्यकीय समितीच्या वतीने वडकी येथील स्मॉल वंडर कॉन्व्हेन्ट वडकी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा सागर यांना विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित खुलताबाद संभाजीनगर येथे सन्मानपुर्वक सन्मानित करण्यात आला. विदयार्थी जडणघडणीत शाळेचे मुख्याध्यापक हे शाळा व समाज यातील महत्वाचा दुवा म्हणून कार्य निभावत असतात. मुख्याध्यापक म्हणून आपल्या अंगी असलेले नेतृत्व गुण आणि अचूक निर्णय क्षमतेच्या जोरावर संस्थाचालक, शिक्षक व पालकांमध्ये समन्वय राखुन पाठशाळेत विविध उपक्रम राबवून शाळेला नावारूपाला आनने तसेच अंगी असणारी सेवाभावी वृत्ती तसेच विदयार्थ्यांप्रती असलेली समर्पणाची भावना मनी बाळगुन प्रशालेत अनेक कौशल्यात्मक व सकारात्मक बदल घडवून आणने त्यामुळे आपली शाळेत आदर्शवत करण्यात यश प्राप्त होते. हे सर्व कार्य आदर्शवत असल्यामुळे सन २०२२ मधील राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार (ए आय एस एफ) अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ तसेच वैद्यकीय समितीच्या वतीने वडकी येथील स्मॉल वंडर कॉन्व्हेन्ट वडकी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा सागर यांना विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित खुलताबाद संभाजीनगर येथे सन्मानपुर्वक सन्मानित करण्यात आला. यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
